माहेजी रेल्वे स्टेशनजवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) ;- धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना माहेजी रेल्वेस्थानकाजवळ घडली असून याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनाराम सोमस सोरेन (वय-४०, रा. विष्णूवेडा, पोस्ट खुडीसर पितोड जि.घिरडी राज्य झारखंड) असे मयत झालेल्या झारखंडच्या तरुणाचे नाव आहे.
सोनाराम सोरेन हा तरुण मुंबईत कामानिमित्त राहायला असून आहेत. दरम्यान रविवारी ७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता सोनाराम हा त्याचा मित्र मुसुदन टुडू याच्यासोबत मुंबईहूनझारखंडकडे जात असताना जळगाव तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशनजवळ तो धावत्या रेल्वेतून खाडी पडला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिनकुमार भावसार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेहाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेबाबत जळगाव रेल्वे स्टेशन पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सोनाराम हा मुंबई येथील ग्रँड रोड येथील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी पोहेकॉ सचिन भावसार हे करीत आहे.