जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील गणेश कॉलनी परिसरातील चंद्रप्रभा कॉलनीत एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुराचा पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्यासुमारास येथे घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . शेख उस्मान शेख इस्माईल वय ४० रा. हुडको पिंप्राळा असे मयत मजुराचे नाव आहे . त्याच्या पश्चात तीन मुले आणि वडील असा परिवार आहे. टिपू शर्मा नामक व्यक्तीकडे तो कामाला असल्याचे समजते. याबाबत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याचे शव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.