जळगाव: गणपती उत्सव जुन्या आठवणी गणपती मूर्तींची होणारी अवहेलना पाणी प्रदूषण पर्यावरण यावर भाष्य करणारा सत्य घटनेची प्रेरित मराठी चित्रपट ‘ ते १० दिवस’ या चित्रपटाचा विमोचन सोहळा नुकताच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात पार पडला.
याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील , सचिव डॉ.वर्षा पाटील, महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी पाटील, हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड,गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील,गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य सौ.नीलिमा चौधरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.या कार्यक्रमात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील साहेब यांनी आपल्या जुन्या आठवणी ताज्या करून या सर्व टीमला भरभरून आशीर्वाद दिले.गणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा असा संदेश ‘ते दहा दिवस’ या चित्रपटातून देण्यात आला आहे. याशिवाय 2004 साली महाराष्ट्रातील एक सत्य घटना, ज्या घटनेची नोंद आरोग्य विभागाने घेतली. अशा सत्य घटनेशी प्रेरित हा चित्रपट आहे. डॉ.उल्हास पाटील अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके यांनी चित्रपटाबद्दल मनोगत व्यक्त करून दिग्दर्शक भारत वाळके आणि त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्यात. युवा नेत्या, महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम साजरा झाला.यावेळी जळगावकरांनी चित्रपट पाहण्यास उपस्थिती लावून पाणी जागृती आणि नैसर्गिक गणेश उत्सव करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संदीप केदार यांनी चित्रपटातील संदेश संकल्पना मांडली.
या चित्रपटाची निर्मिती राघव फिल्म प्रोडक्शन यांनी केली असून बंधन प्रोडक्शन यांनी सहाय्यक निर्माता म्हणून भूमिका बजावली.चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक भारत वाळके,चित्रण,संकलन योगेश ठाकूर यांनी केले असून सध्या हा चित्रपट हंगामा (Hangama ) या ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे.
गणपती उत्सवातील गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विडंबन आणि पाणी प्रदूषण थांबण्यासाठी हा चित्रपट सर्वांनी पहावा असे आव्हान लेखक दिग्दर्शक भारत वाळके यांनी केले आहे.