मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पारंबी ते कुर्हा दरम्यान मुक्ताईनगर आगाराच्या बसला अपघात झाल्याने त्यात सुमारे १५ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर आगाराची बस क्रमांक (एम एच २० बीएल १७७०) ही बस प्रवाशांनी भरून पारंबीकडे जात असताना पारंबी ते कुर्हा दरम्यान असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या खाली उतरली. परंतु बस चालकाने सदर बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यात आनंद सुनील झांबरे (वय २२ वर्षे) समाधान तायडे (वय ६९, रा. मानेगाव) कमल गोविंदा पवार (वय ५९, वडोदा), जानोकार त्र्यंबक महाले (वय ७५ वर्षे), अनुराधा पाटील (वय ३५ वर्षे, वेळ सांगवे), कस्तुराबाई भोलांकर (वय ७०, शिरसोली) सपना विनोद पाटील (वय २७ वर्षे), सार्थक विनोद पाटील (वय २, जामनेर) दोन वर्षे आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.