आ. राजूमामांसह मान्यवरांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जुने जळगांव येथील पांझरापोळ टाकी चौकातील तरूण कुढापा मंडळाच्या जळगाव शहरातील गणेश उत्सव २०२४ साठी प्रथम पाटपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यंदा मंडळाचे ६१ वे वर्ष आहे.
पाटपुजन सोहळासाठी जळगाव शहर विधानसभा मतदासंघांचे आ. राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर सुनील खडके, माजी नगरसेवक शरद तायडे, सामाजिक कार्यकर्ते पियुष ललित कोल्हे, महेश चौधरी, नंदू चौधरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी मंडळाचे सदैव प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून कार्यरत असणारे स्वर्गीय कुंदन सुधीर चौधरी व .रवींद्र अण्णा चौधरी यांना मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्याकरता मंडळाचे अध्यक्ष भोजूराज बारी व उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पाटील, सतीश ठाकूर, शंभू भावसार, प्रशांत सुरळकर, नारायण कोळी, पंकज भावसार, विशाल दिगंबर पाटील, बंटी चौधरी, अनिल चौधरी रवींद्र माळी, चेतन चौधरी, राहुल कोळी, मोहित पाटील, जयेश अत्तरदे, विकी ठाकूर, जयेश कोल्हे, हरीश चौधरी, बंटी कोळी सुमित सपकाळे, गौरव सोनार, निलेश माळी, यश मराठे, रोहन कोल्हे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.