जळगाव तालुक्यातील असोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आसोदा गावात राहणाऱ्या एका महिलेचे नाव वापरून इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट खाते उघडून त्यात महिलेच्या मुलीचे एडिट केलेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील असोदा येथे ४२ वर्षीय विवाहिता राहत असून ११ सप्टेंबर ते आजपावेतो एका अनोळखी व्यक्तीने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते व फेसबुक खाते तयार केले. दोन्ही खात्यांना महिलेचे नाव वापरून अनोळखी इसमाने तिच्या मुलीचे एडिट केलेले फोटो आणि व्हिडिओ त्यात व्हायरल केले. याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन अनोळखी व्यक्तीविरुद्ध १९ रोजी सुपारी ३ वाजता गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.