जळगाव ( प्रतिनिधी ) – नेहरू चौकातून गणेशोत्सवात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार ७ रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.
सोनाली सागरमल सोमानी रा. दादावाडी, ता. जळगाव ही तरूणी मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता दुचाकी (एमएच १९ सीके ७११९)ने मित्रांसोबत गणपती पाहण्यासाठी आली होती. त्यांनी त्यांची दुचाकी नेहरू चौकातील बिगबाजारच्या रस्त्यावर पार्किंगला लावून गणपती उत्सवात सहभागी झाल्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. रात्री १०.३० वाजेता घरी जाण्यासाठी सोनाली सोमानी ह्या दुचाकीजवळ आल्या असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. बिगबाजार परिसरात त्यांनी व त्यांच्या मित्रांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू दुचाकी मिळून आली नाही. बुधवार ७ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे.