जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील हरीविठ्ठल नगरात ४४ वर्षीय व्यक्तीवर चार जणांनी हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी, ११ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत जगन सोनवणे यांना कोणतेही कारण नसताना संशयित आरोपींनी शिवीगाळ करत दगडाने डोक्यावर हल्ला केला. या प्रकरणी रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत सोनवणे (रा. हरीविठ्ठल नगर) शनिवारी रात्री लाकडी वखारीजवळ उभे असताना संशयित पप्पू शंकर कोकाटे, किरण शंकर कोकाटे (दोघेही रा. तडवी गल्ली, हरीविठ्ठल नगर) आणि दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांनी सोनवणे यांना शिवीगाळ केली आणि अचानक कमरेवर लाथ मारून त्यांना गटारीत ढकलले. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दगडाने डोक्यात मारुन त्यांना गंभीर दुखापत केली. जखमी भरत सोनवणे यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून पप्पू आणि किरण कोकाटे तसेच दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.