जळगाव शहरातील सम्राट कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाहीए. सम्राट कॉलनी परिसरातील लक्ष्मी नगर येथे एका तरुणावर अज्ञात इसमांनी क्षुलक कारणावरून चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस माहिती घेत असून घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
शुभम पुंडलिक महाजन (वय ३०, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री त्याला ललित दीक्षित व अन्य एक जणाने त्याच्या घराजवळ बोलाविले. क्षुल्लक कारणावरून त्याच्याशी वाद घालू लागले. त्यानंतर एकाने मागील बाजूने उजव्या मांडीवर चॉपरने गंभीर वार केला. त्यात तो जखमी झाला. त्याला तत्काळ कुटुंबीय व इतरांनी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले आहे.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची घेत त्याची विचारपूस सुरु केली आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.