भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : गर्दीत धक्का लागल्याच्या वादातून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी दि. १४ एप्रिल रोजी रात्री १२.४० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गौरव भास्कर कापडणे (वय ३९, वरणगाव रोड, तक्षशीला नगर, भुसावळ) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यांना संशयिताचा धक्का लागल्याने त्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून संशयिताने हातातील चाकूने पाठीवर हल्ला केला. मात्र हाताने वार चुकवल्याने बोटाला दुखापत झाली. याप्रकरणी संशयित भूषण गणेश शिंदे (लाल जैन मंदिर, तक्षशीला नगर, भुसावळ), चेतन भुसे (खडका रोड, भुसावळ) व गणेश शिंदे (वरणगाव रोड, लाल जैन मंदिराजवळ, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांतीलाल केदारे करीत आहेत.