कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन यांचे प्रतिपादन
नूतन महाविद्यालयात सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा हृद्य सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) :- तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. तरुणांची देशसेवेला निवड होणे म्हणजे पालकांचा हा सत्कार असतो. नूतन मराठा महाविद्यालयातील अनेक एनसीसी कॅडेट सैन्यात गेलेले आहे. विद्यार्थ्यांच्या यशात गुरुजनांचीदेखील महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन यांनी केले.
येथील नूतन मराठा महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा व पालकांचा भावपूर्ण सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अभिजित महाजन बोलत होते. मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख होते. प्रस्तावनेत एनसीसी प्रमुख लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी महाविद्यालयातील एनसीसी युनिटच्या वाटचालीबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.तसेच रामेश्वर नामदेव पाटील व प्रेरणा गजानन पाटील दोघेही टीएससी, गोल्ड दिल्ली यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी कमांडिंग अधिकारी अभिजित महाजन यांनी उपस्थित कॅडेटच्या विद्यार्थ्यांना सांगितले की, जे विद्यार्थी सैन्यात दाखल झाले आहेत, त्यात आई वडिलांचं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच योगदान या विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्यासाठी महत्वाचं आहे. देशसेवेसाठी तरुणांनी सैन्यात भरती होण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी अध्यक्ष स्थानावरून सांगितले की, या सर्व विद्यार्थ्यांबद्दल अभिमान आहे. तुम्ही तुमच्या मुलांना देश सेवेसाठी पाठवले, या साठी पूर्ण देश तुमचा ऋणी राहू इच्छितो, असे म्हणत यशस्वी मुलांच्या पालकांना धन्यवाद दिले. स्वतःच्या कुटुंबासाठी लोक जगत असतात. पण महाविद्यालयातील मुले देशाच्या रक्षणासाठी गेले ही खूप अभिमानाची बाब आहे, असेही प्राचार्य म्हणाले.
सूत्रसंचालन प्रा.दिलराज पाटील यांनी,प्रमुख अतिथी यांचा परिचय प्रा.भागवत पाटील यांनी तर आभार लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य संजय पाटील, प्रा.हेमाक्षी वानखेडे, लेफ्टनंट भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
निवड झालेले विद्यार्थी
वैभव दगडू पाटील (पोस्ट- भारतीय नेव्ही), गौतम सुखराम धाडी (पोस्ट- अग्निवीर 2 ATC जबलपूर), नीरज गोपालकृष्ण मोरे (अग्निवीर-बिहार रेजिमेंट), किरण निंबा साळुंखे (पोस्ट- अग्निवीर जाट रेजिमेंट), रमेश गलू सपकाळे (पोस्ट- अग्निवीर आयटीबीपी), वैभव रवींद्र शेळके (अग्निवीर बीइजी सेंटर, पुणे), रोहित अमृत बारी (अग्निवीर, गेनोडियन रेजिमेंट),तेजस कैलास पाटील (अग्निवीर सिग्नल रेजिमेंट), पवन अनिल पाटील (अग्निवीर बी.इ.जी.सेंटर पुणे),सोनाली विकास पाटील (बीएसएफ).