जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव – औरंगाबाद महामार्गवरील रेमन्ड चौकात काहीही कारण नसतांना १८ वर्षीय तरूणाला अनोळखी तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य घनश्याम मोरे (वय-१८) रा. तुळजाई नगर, कुसुंबा ता.जि.जळगाव हा आयटीआयचे शिक्षण घेतो. काल बुधवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चैतन्य हा कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आला होता. त्यावेळी जळगाव औरंगाबाद महामार्गावरील रेमन्ड चौकातून घरी जात असतांना दारूच्या नशेती अनोळखी तीन जणांनी त्याचा रस्ता आडवला. काहीही कारण नसतांना चैतन्यला बेदम मारहाण केली. तर एकाने दगड उचलून चैतन्यच्या डोक्यात मारला. यात चैतन्यच्या डोक्याला दुखापत झाली. जखमीअवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दुपारी ५ वाजेच्या सुमारास चैतन्य मोरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अनोळखी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.