जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे लहान मुलांच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाच्या अंगावर धावून जात लाथाबुक्क्यांनी आणि चापटांनी मारहाण करण्यात आले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत, दोघांनी आम्ही स्वतःला मारून तुझे नाव गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली. त्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल मुरलीधर अस्वार (वय २०, रा. शिरसोली प्र. न.) याने तक्रार दिली आहे. संशयित आरोपी सागर संजय बारी, आकाश संजय बारी, विशाल भिल, सुखदेव उर्फ सुख्या (पूर्ण नाव गाव माहित नाही, सर्व रा. शिरसोली ता. जळगाव) यांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सुमारास शिरसोली येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी कुणाल अस्वार याला लाथाबुक्क्यांनी आणि चापटाने मारहाण केली. तसेच सुख्या नावाचे व्यक्तीने मारहाण करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच सागर आणि आकाश याने, आम्ही स्वतःला मारून घेत तुला गुन्ह्यात फसवू असे धमकी दिली. म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.