चोपडा ग्रामीण पोलिसांची कामगिरी
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लासुर गावाचे हद्दीत उत्तमनगर ते लासुर रोडवर इसम एक तरुण गावठी कट्टा बाळगून असल्याच्या माहितीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आकाश गोरखनाथ सोनवणे (वय २६, रा.रिधुर ता.जि.जळगांव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि शेषराव नितनवरे यांना गुप्तबातमीद्वारे मार्फत बातमी मिळाली. लासुर गावाचे हद्दीत दि.१३ रोजी दुपारच्या सुमारास उत्तमनगर ते लासुर रोडवर आकाश गोरखनाथ सोनवणे हा त्याचे ताब्यातील १ गावठी अग्निशस्त्र पिस्टल हे विनापरवाना बेकायदेशीर आपले कब्जात बाळगुन वाहतुक करुन घेवुन जात आहे.
सदर संशयित इसमांस सपोनि नितनवरे यांच्यासंह पोहेकॉ राकेश पाटील, रावसाहेब पाटील, चेतन महाजन, अभिषेक सोनवणे, विशाल पाटील यांनी लासुर ते उत्तमनगर गावी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचा पिस्टल व हिरो होडा कंपनीची दुचाकी मिळुन आली आहे. याप्रकरणी रावसाहेब पाटील यांनी फिर्याद दिलेवरुन गुन्हा दाखल करम्यात आला आहे. गुन्हयांचा पुढील तपास सपोनि शेषराव नितनवरे व किरण पारधी हे करीत आहेत.