जळगाव ( प्रतिनिधी ) – दवाखान्यात जात असलेल्या तरूणाला मेडीकलवर जाणाऱ्या चार तरूणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. एमआयडीसी पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोकुळे लोंढे (वय-३० , रा. पायधन हॉस्पीटल समोर कंजरवाडा) हा वडीलांसह ६ ऑक्टोबररोजी सायंकाळी पंचमुखी हनुमान मंदीराजवळील शोभा हॉस्पिटलशेजारी असलेले मेडीकलवर मास्क घेण्यासाठी गेले. मेडीकलवरील चार अनोळखी तरूणांनी चिडवले. याचा जाब विचारण्यासाठी गेला असता चौघांनी बेदम मारहाण केली. अनोळखी चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल सोनार करीत आहे.







