खिर्डी खुर्द गावात घेतले ताब्यात
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील निंभोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका गावातील तरुणाला २ गावठी पिस्टल जप्त केली आहे. त्याच्यावर निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल रामलाल बारेला (वय २८, रा. खिर्डी ता.रावेर) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. खिर्डी खुर्द शिवारातील निळकंठ पुंडलिक बढे यांच्या शेत गट क्रमांक ३४९ मध्ये एका घराशेजारी संशयीत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती निंभोर्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पथकाने धाव घेत संशयीताला ताब्यात घेतले. अंग झडतीत दोन पिस्टल निघाल्याने ते जप्त करण्यात आले. आरोपीविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.