पारोळा तालुक्यातील टिटवी येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यात टिटवी येथे एक शेतमजूर तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. १० मे रोजी मध्यरात्री घडली असून पहाटे उघडकीस झाली आहे. याप्रमाणे पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अर्जुन रमेश भिल (वय ३५, रा. टिटवी ता. पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात परिवारासह राहत होता. मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता.(केसीएन) शनिवारी रात्री साडेबारा वाजता अर्जुन हा त्याच्या घराशेजारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेजवळ झोपण्यासाठी गेला होता. सकाळी त्याचा चुलत भाऊ झुलाल धनराज भिल हा शाळेजवळून जात असताना त्याला अर्जुन भिल याने सुबाभूळच्या झाडाला रूमालाच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळेला त्याने त्याच्या भावाला आणि वडिलांना माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. घटनेमुळे टिटवी गावावर शोककळा पसरली आहे. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.