रावेर ( प्रतिनिधी ) – शहरातील २७ वर्षीय तरूणाने निंभोरा सिम येथील तापी नदी उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आली तो बेपत्ता झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी शेमळदे गावाजवळ या तरूणाचा मृतदेह आढळून आला .
शहरातील सतीष रमेश महाजन (वय-२७) या तरूणाने रविवारी निंभोरासीम येथील तापी नदीच्या पुलावरन रात्री उडी घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याचा मृतदेहाचा शोध घेण्यात आला होता परंतू आढळून आला नव्हता. आज शेमळदे गावाजवळ मृतदेह आढळून आला पोलीसांत नोंद घेण्याचे काम सुरू होते.