धरणगाव तालुक्यात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील २६ वर्षीय तरुणाने शुक्रवारी दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास टाकळी फाटकाजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पंकज रमेश पाटील (वय २६) असे मयत तरुणाचे नाव आहे. पंकज पाटील हा युवक पाळधीत एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्याच्या पश्चात लहान भाऊ विकी पाटील व आई असा परिवार आहे. वडिलांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे. शुक्रवारी दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास टाकळी फाटकाजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, पंकजचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. याठिकाणी नातेवाईकांनी आक्रोश केला. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.