धरणगाव शहरातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील लहान माळीवाडा परिसरात राहणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील मागच्या खोलीत पंख्याला बेडसिट बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र भगवान महाजन (वय ४१ रा. लहान माळीवाडा, धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. राजेंद्र महाजन हे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी १३ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना त्यांनी राहत्या घराच्या मागील घरात पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. घटना कळताच नातेवाईकांनी त्याना खाली उतरवून तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ चंदुलाल सोनवणे हे करीत आहे.