रावेर तालुक्यातील वाघोदा रस्त्यावरील घटना
रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाघोदा रस्त्यावर एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या आधी उघडकीस आली आहे. दरम्यान त्याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मध्ये नेमके काय म्हटले आहे त्याच्यावर पुढील तपासाची दिशा राहील अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
मुकेश उर्फ विजय रमेश भंगाळे (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. मुकेश उर्फ विजय रमेश भंगाळे याने पत्नीला मोबाईलवर मी आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून त्यांच्या राहत्या घराजवळच्या जुन्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी निंभोरा पोलिसांनी माहिती मिळताच तत्काळ तपास करीत आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र तो जुन्या घरातच गळफास घेतलेला आढळून आला. त्याचे रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, त्याच्या मोबाईलसोबत एक सुसाईड नोट मुकेश याने लिहून ठेवली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी या सुसाईड नोटमध्ये काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निंभोरा पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सपोनी हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अभय ढाकणे करीत आहेत.