पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील करमाड बुद्रुक येथील २७ वर्षीय तरुणाने घराच्या छतावर जाऊन विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली .
भूषण रवींद्र पाटील ( वय २७ रा करमाड बुद्रुक ) आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता घराच्या छतावर गेला आणि काहीतरी विषारी औषध सेवन केले त्याला उलट्या होऊ लागल्याने घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले समाधान सुधाकर पाटील यांनी खबर दिल्यावरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.