जळगाव ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील रहिवाशी तरुणाचा आज सर्पदंशानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला

वरखेडी येथील रहिवाशी जयराम ज्योतीराम मांग या २७ वर्षीय तरुणाला ५ सप्टेंबररोजी सापाने चावा घेतला होता त्याचे वडील ज्योतीराम मांग यांनी त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले होते मात्र आज जवळपास आठवडाभरानंतर त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला
जयराम आणि त्याचे वडील ज्योतीराम मजुरी करून उदरनिर्वाह करतात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये असलेल्या या पित्याकडे म्हणजे जयरामच्या वडिलांकडे जयरामचा मृतदेह गावी नेण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला काहीच पैसे नव्हते ही बाब लक्षात आल्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील काही डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी सरकारी शववाहिका उपलब्ध करून दिली होती .







