जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावातील पंचमुखी हनुमान मंदिर भागातील न्यू जोशी कॉलोनीतील रहिवाशी असलेल्या २४ वर्षांच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली .
जळगावातील पंचमुखी हनुमान मंदिर भागातील न्यू जोशी कॉलोनीतील रहिवाशी अश्विन भरतकुमार जांगडा या २४ वर्षीय तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्याचे नातेवाईक संतोषकुमार ललवाणी यांनी दाखल केले होते . तेथे त्याला मयत घोषित करताना या तरुणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सीएमओ डॉ. दलोरे यांनी सांगितले आणि एम आय डी सी पोलीस ठाण्याला या घटनेबद्दल माहिती दिली . आज दुपारी १२ वाजून १० मिनिटांपूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ( गु र न १५२ / २०२१ ) करण्यात आली आहे . पुढील तपास पो ना महेंद्र गायकवाड करीत आहेत.