जळगाव (प्रतिनिधी) –आव्हाणा शिवारात २१ वर्षीय तरुणाला क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तालुका पोलिसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित रतन पवार (रा.खोटे नगर ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, संशयित आरोपी महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील याने गुरुवारी २४ रोजी रात्री ७. ३० वाजेच्या सुमारास आव्हाणा शिवारात एका शेताच्या बंधाऱ्याजवळ येत म्हणाला की, ज्या मुलांसोबत आपले पटत नाही त्यांच्यासोबत असतांना मला हात देत जाऊ नको. भविष्यात आमच्यात काही वाद झाल्यास त्याला तूच जबाबदार राहशील. या कारणावरून भांडण झाल्यावरून संशयित महेश पाटील याने दारूच्या नशेत फिर्यादी रोहित यास चपट्या-बुक्क्यांनी मारहाण करून डाव्या हाताच्या बोटाला चावा घेत दुखापत केली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी महेश पाटील हा दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्याला अटक झालेली नाही. तपास पोहेकॉ. उमेश भांडारकर करीत आहेत.








