शासकीय रुग्णालयात घेतले उपचार
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील विमानतळ समोर केंद्र व राज्य सरकारचा ‘लखपती दीदी’ संमेलन रविवारी दि. २५ रोजी घेण्यात आले. या मेळाव्यात गर्दी झाल्यामुळे ढकलाढकली झाल्याने एका तरुणाचा चिखलावरून पाय घसरून अपघात झाला. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.
तालुक्यात आज रविवारी दि. २५ रोजी मोठ्या थाटात लखपती दीदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही अनेक मंत्री व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. (केसीएन)या कार्यक्रमातून बाहेर निघत असताना अचानक धावपळ झाली. काही महिला या गर्दी झाल्याने ढकलाढकली झाली. या गदारोळात सागर प्रवीण सूर्यवंशी (वय २९, मेहरूण, जळगाव) हा चिखलावरून पाय घसरून पडल्याने त्याच्या डाव्या हाताचे हाड सरकले.
सागरच्या मित्रांनी तत्काळ त्याला सावरले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला औषधोपचार करून प्रकृती स्थिर झाल्यावर घरी पाठविण्यात आले. दरम्यान, या घटनेमध्ये अनेक महिलांनादेखील किरकोळ मार लागल्याची माहिती काही नागरिकांकडून मिळाली आहे.