जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील घटना, ओझरला शोककळा
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील १७ वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
विष्णू रघुनाथ मोरे (वय १७, रा. ओझर ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. कुटुंबीयांसोबत तो ओझर गावात राहत होता. त्याचा मित्र रामू विठ्ठल सोनवणे यांच्यासह विष्णू मोरे हा बोदवड येथे जात असताना शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता सुमारास भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली.(केसीएन)यात दुचाकीवरील विष्णू मोरे हा जागीच ठार झाला. तर रामू विठ्ठल सोनवणे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान विष्णू मोरे यांचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. तर विष्णू मोरे याच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. घटनेबद्दल जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अल्पवयीन तरुणाच्या मृत्यूमुळे ओझर गावात शोककळा पसरली आहेत.