चोपडा ( प्रतिनिधी ) :- येथील एक प्रौढ कामावर जातो, असे सांगून घरातून निघाला. परंतु घरी परतला नाही. शोध घेतला असता त्यांची दुचाकी शिरपूर येथील गिधाडे पुलावर तर, मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिकन गुलाबराव पाटील (४०, रा. कुसुंबा, ता. चोपडा, जि. जळगाव) असे मृताचे नाव आहे.
भिकन हे १८ रोजी कामावर जातो, असे सांगून दुचाकीने निघाले होते. परंतु ते बराच काळ घरी आले नसल्याने नातेवाइकांनी शोध घेतला.
या दरम्यान, गिधाडे पुलावर त्यांची दुचाकी आढळून आली. तापी नदीपात्रात शोध घेतला असता त्यात त्यांचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.