जळगांव (प्रतिनिधी) – तंत्रज्ञानाधारित आरोग्यसेवा आणि नर्सिंग क्षेत्रातील डिजिटल क्रांती यावर आधारित तंत्रसक्षम युगातील नर्सिंग ही आंतरराष्ट्रीय परिषद १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे अत्यंत यशस्वीपणे पार पडली. आज परिषदेचा समारोप करण्यात आला.
भारतीय परिचर्या परिषद, महाराष्ट्र परिचर्या परिषद आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (चणकड) यांच्या संयुक्त मान्यतेने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.राज्यभरातील विद्यार्थी, शिक्षक, नर्सिंग तज्ज्ञ आणि डिजिटल हेल्थ क्षेत्रातील संशोधकांचा या परिषदेत उत्स्फूर्त सहभाग होता. परिषदेसाठी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलतर्फे डॉ. पुष्पेंद्र निकुंभ तर आरोग्य विज्ञान विदयापिठातून प्रो. मेलीसा फर्नांडिस यांनी निरीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.पहिल्या दिवशी वर्चुअल नर्सेस, नर्सिंगमधील डिजिटल कौशल्ये, टेलीहेल्थ सेवांचा विस्तार, वेअरेबल डिव्हाइसेस, हेल्थ प्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संकट व्यवस्थापन साधने अशा महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.उद्घाटन सत्रात की-नोट स्पीकर्स म्हणून -डॉ. श्रीलेखा राजेश (आरोग्य विज्ञान विदयापिठ अधिष्टाता),डॉ. वैशाली मोहिते (अधिष्टाता केआयएनएस महाविद्यालय कराड),डॉ. एस. जे. नलिनी (प्राचार्या, रामचंद्र इन्स्टिट्यूट, चेन्नई),डॉ. श्रीजना प्रधान (सॅमकॉन),डॉ. मारिया ब्लेसिल्डा व डॉ. अबीर मबदलकडेर (किंग फैजल युनिव्हर्सिटी, सौदी अरेबिया)- यांनी उपस्थित राहून नर्सिंगमधील डिजिटल परिवर्तनावर विचारमंथन केले.दुसर्या दिवशी टेलीहेल्थ अडथळयावर मात कशी करावी व चॅटबुल नर्सिंग या विषयांवरील सत्रांचे मार्गदर्शन प्रो. डॉ. मिनी राणी बेथ (किंग फैजल युनिव्हर्सिटी) आणि प्रो. सॅम्युअल फर्नांडिस (नामको कॉलेज ऑफ नर्सिंग, नाशिक) यांनी केले.विद्यार्थ्यांसाठी आयोजित पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत ३९८ पैकी ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एस. आर. हेल्थ एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे दिलेल्या पारितोषिकांमध्ये – प्रथम पारितोषिक (६,०००) : डॉ. नीतांजली पाटील द्वितीय पारितोषिक (४,०००) : कुमारी कविता कदम यांना प्रदान करण्यात आले. समारोप सत्रात डॉ. श्रीलेखा राजेश यांनी उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले.दोन दिवसीय परिषद नर्सिंग क्षेत्रातील डिजिटल प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून नोंदली जात असून या परिषदेला राज्यभरातून मोठी प्रशंसा मिळत आहे. कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन प्रो. निम्मी वर्गीस तर आभार उपप्राचार्य जेसिंथ ढाया यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या प्रो. विशाखा गणवीर यांच्या मार्गदर्शनानुसार गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांनी अशा परिषदांमधून तंत्रज्ञानातील अडथळयावर विचार विनीमय होवून मात करण्यासाठी विविध मार्ग शोधण्यास मदत होते. रूग्णसेवेत सुलभता आणण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त असल्याचे सांगितले.
गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करीत जळगावसारख्या शहरातही आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार मिळण्यास या परिषदेतून उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला.प्राचार्य विशाखा गणविर यांनी ही परिषद म्हणजे ज्ञानार्जनाची पर्वणी असून निश्चीतच विदयार्थी,प्राध्यापकांना याचा लाभ होईल असे मत व्यक्त केले.
या दोन दिवसाच्या परिषदेत विविध प्रबंधातून परिचारीका क्षेत्र तंत्रसक्षम बनवण्यासाठी येणाऱ्या अडथळयावर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला.