पारोळ्याचे करण पवार यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील तामसवाडी येथील सरपंच, उपसरपंच व ९ सदस्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये तसेच पारोळा माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात भाजपासाठी पक्ष संघटन करू असे सरपंचांनी सांगितले.
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री सतीश पाटील यांच्या नेतृत्वात होती. मात्र तेथे पारोळाचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते करण पवार यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पक्ष संघटन करण्यासाठी सरपंच मिनाबाई वसंत भिल व उपसरपंच मनीषा अनिल पवार यांनी सदस्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
यावेळी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, युवा नेते करण पवार, जिल्हा परिषदेतील नेते प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.