भुसावळ (प्रतिनिधी ) ;- कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण मृत पावल्याची घटना तालुक्यातील तळवेल या गावात एका शेतकऱ्याच्या घरासमोर उघडकीस आली आहे.
तालूक्यातील तळवेल गावातील रमाईनगर जवळील पाण्याच्या टाकी शेजारील एका शेतकऱ्याच्या वाड्यासमोरील रस्तावर आठ ते दहा वर्षाच्या नरजातीचे हरिण मृतावस्थेत नागरिकांना दिसले. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून घटनास्थळी पोहचत मृत हरणाच्या मृतदेहाचा पंचनामा करून वन विभागाच्या वंदना सोनवणे व वन मजुर यांनी शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्रथमदर्शनी हरणास मागील दोन्ही पायाला जखमा असल्याने कुत्र्याच्या चाव्यामुळे झाल्याचा अंदाज पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. उभाडे यांनी वर्तविला . जंगलात एकटे हरण पाहून कुत्रे त्यांच्या मागे लागून त्याला जखमी केल्याने हरणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.