चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहर पोलिसांनी तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या दोघांना अटक केली आहे. मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास ही कारवाई शहरातील शास्त्रीनगर भागातील साई बाबा मंदीराजवळ करण्यात आली.
मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (१९, शैंदला, ता. मेहकर जि. बुलढाणा, ह.मु बस स्टॅण्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) व किरण सखाराम गवळी (२२, लक्ष्मीनगर, चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, चाळीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश बेलदार, दीपक पाटील, निलेश पाटील, अमोल भोसलेे, नंदकिशोर महाजन, शरद पाटील आदींच्या पथकाने केली. संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार योगेश दिलीप बेलदार व कॉन्स्टेबल निलेश हिरालाल पाटील करीत आहेत. संशयित आरोपी मंजितसिंग दिलीपसिंग बावरी यास २०२२ मध्ये चोरी प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली होती.