जळगाव पंचायत समितीतर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) – पोषण पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोषण पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत पालक आणि स्वयंपाकी -मदतनीस यांच्यासाठी जळगाव तालुकास्तरीय तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धेचे आयोजन अनुभूती शाळेत करण्यात आले. यात प्रथम क्रमांक किनोद जिल्हा परिषद शाळेच्या करिष्मा रोहिदास सपकाळे यांनी मिळविला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सरला पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव पंचायत समिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी खलील शेख आणि प्रभारी अधीक्षक विजय पवार उपस्थित होते. परीक्षक म्हणून शैला चौधरी व नीता वानखेडकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुणाल पवार यांनी केले. प्रास्ताविक अधीक्षक विजय पवार यांनी केले. गटशिक्षणाधिकारी खलील शेख, माता पालक सविता पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
ग्रामीण व शहरी शाळेतील पालक, स्वयंपाकी, मदतनीस यांनी विविध तृणधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे सादरीकरण केले. केंद्र प्रमुख वैशाली बाविस्कर, विनोद चव्हाण, अजय शिरसाठ यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते. उपस्थितांनी पोषण शपथ घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. यावेळी पाककृती स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात प्रथम क्रमांक करिष्मा रोहिदास सपकाळे (जि. प. शाळा, किनोद), द्वितीय -सविता लक्ष्मीकांत पाटील (प. वि.पाटील विद्यामंदिर, जळगाव), तृतीय – रेखा दिलीप सोनवणे (जि. प. शाळा पाथरी) यांना मिळाला आहे.