दुकान नावावर करण्यासाठी घेतली होती लाच
जळगाव (प्रतिनिधी) – तक्रारदाराचे दुकान नावावर करून देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेतांना मेहरूणचे तलाठी सचिन एकनाथ माळी यांना आज दि. ३० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
स्टँप वेंडर असणार्या तक्रारदाराला एक दुकान नावावर करायचे होते. यासाठी त्यांनी मेहरूण येथील तलाठी सचिन एकनाथ माळी यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी एक हजार रूपयांची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. यानुसार आज सापळा रचण्यात आला. या अनुषंगाने तलाठी सचिन एकनाथ माळी ( वय ३३,) यांना रंगेहात अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आज मेहरूण तलाठी कार्यालयात सापळा रचून सचिन माळी यांना रंगेहात लाच स्वीकारतांना अटक केली. ही कारवाई एसीबीचे डिवायएसपी गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक निलेश लोधी, सहाय्यक फौजदार रविंद्र माळी,पोहेकॉ अशोक अहीरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, वंदना अंबीकार, शैला धनगर,सुनिल शिरसाठ, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख व ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.