जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील फैजपूर येथील प्रांताधिकारी अजित थोरबोले यांची अहमदनगर जिल्ह्यात विशेष भूसंपादन अधिकारी वर्ग 1 म्हणून बदली झाली आहे. तसेच यावल, मुक्ताईनगर व जळगावातील संजय गांधी योजनेच्या तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत, याबाबतचे आदेश महसूल व वन विभागाचे उपसचिव माधव किर यांनी गुरुवारी 1 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा काढले.
यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या तहसीलदारपदी तर . मुक्ताईनगर येथील तहसीलदार शाम वाडकर यांची नगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या तहसीलदारपदी बदली झाली आहे.
जळगाव न.पा.क्षेत्र,संजय गांधी योजनेच्या तहसीलदार श्वेता संचेती यांची मुक्ताईनगर येथे तहसीलदारपदी बदली झाली आहे. संचेती यांच्या जागी पाथर्डी, नगर येथील नामदेव रामचंद्र पाटील येणार आहेत. यावलच्या तहसीलदारपदी अहमदनगर येथून महेश कौतिक पवार येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या तहसीलदारपदी तळोदा,जिल्हा नंदुरबार येथून पंकज प्रेमचंद लोखंडे येत आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदारपदी सुरेश वसंत थोरात मालेगाव येथून येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शुल्क तहसीलदारपदी मुकेश हिवाळे नंदुरबार येथून तर चोपड्याच्या तहसीलदारपदी नाशिकचे छगन वाघ येत आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल व वनविभागाने गुरुवारी जारी केले.







