जळगाव (प्रतिनिधी) – रावेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक महाविदयालय रावेर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोशिएशन जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित “स्वास्थ भारत रन स्पर्धेत” दि. १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत केव्हाही सहभाग नोंदवु शकतात.
या उपक्रमात चालणे , धावणे व सायकल चालविणे या तीन बाबीचा समावेश आहे., आपण वरील तीन बाबीपैकी एका बाबीत सहभागी होवू शकतात., धावणे,चालणे व सायकल चालविणे या साठी आपण आपल्या आवडीच्या मार्गाची निवड करू शकतात.( आपल्या परिसरात ,अंगणात,गच्चीवर शाळेचे क्रीडांगण, मोकळ्या जागेवर सुरक्षीत अंतर ठेवून हा उपक्रम करायचा आहे),उपक्रमास सुरुवात करण्या अगोदर प्रथम आपल्या मोबाईलला असलेले टॅकीग ॲप चालु करावे. त्याची लींक खालील प्रमाणे Link for Google Fit App*:https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.fitness, Link for Strava App:https://play.google.com/store/apps/details?id=com.stravaआपण चालणे,धावणे,सायकल चालविणे यापैकी कोणतेही एका बाबीत सहभागी होवू शकतात., चालणे , धावणे व सायकल चालविणे पुर्ण केल्यानंतर आपण किती अंतर चाललो,धावलो,किंवा सायकल चालवली यांची नोंद घ्यायची व मोबाईलला त्याचा स्क्रीन शाॅट काढायचा, त्यानंतर सर्व माहीती स्क्रीनशॉट सह खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली, वैयक्तिक माहीती भरून. उपक्रमात सहभागी होवून सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करून घ्यावयाचे आहे.,
लिंक :-https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSel0L0ryVayG47ZHT2Ti7AcC4yb6u4IPGQYDAccDARH9OAIWA/viewform?usp=pp_url
आपली माहीती भरावयाची
या ग्रुपमधील सर्व सहभागी खेळाडूनीं गव्हरमेंट ऑफ इंडीया व कोव्हीड संदर्भात मार्गदर्शन तत्वाचें तसेच social distancing चे पालन करायचे आहे. कोणीही या संदर्भात पालन न करता सहभागी झाल्यास काही अनुचीत प्रकार घडल्यास त्याला आयोजक जबाबदार असणार नाही .सदस्यांनी यात सहभागी होवून आपल्या परिसरातील , कुटुंबातील, शाळेतील, संघटनेतील पदाधिकारी,खेळाडू व पालक यांनाही यात सहभागी करून जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत . जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचीव राजेश जाधव , व्ही. एस. नाईक महाविदयालयाचे क्रीडा संचालक प्रा.उमेश पाटील यांनी केले आहे.काही अडचण आल्यास सतीष वाघ मो क्र 9545090006, ई-मेल – waghsatish1991@gmail.com वर संपर्क साधावा.
ऑनलाईन स्पर्धा प्रथमच – प्रा.उमेश पाटील
श्री व्ही एस नाईक महावीदयालयाने अजुनपर्यंत अनेक स्पर्धा यशस्वी घेतल्यात . ऑनलाईन स्पर्धा प्रथमच आपण घेत आहोत हया अशा स्पर्धामुळे खेळाडुनां नवीन चेतणा व प्रोहात्सन मिळेल आणी सहभागी झालेल्या सगळयाचे स्वास्थ निरोगी ठेवण्यासाठी प्रेरणा मिळेल हेच उद्धेश ठेवून सदर स्पर्धा घेत आहोत सदर स्पर्धला संस्थेचे चेअरमन हेंमत नाईक,उपप्राचार्य व्ही.बी.सुर्यवंशी, सर्व प्राध्यापक वृंद यांनी अंभीनंदन केल्याची माहिती क्रीडा संचालक. श्री व्ही. एस. नाईक महा. रावेरचे प्रा.उमेश पाटील यांनी सांगितले.