जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील स्वातंत्र्य चौकात श्रीपाद हॉस्पिटलजवळ मोठे झाड अचानक दोन चारचाकी वाहनांवर कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्ही चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यापैकी एक वाहन इंडिया गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणलेले होते होती तर दुसरे तेथून जवळच असलेल्या यस बँकेच्या अधिकाऱ्यांचे असल्याची माहिती समोर आली आहे हे झाड विजेच्या तारांवर पडल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या असून या भागात वीज पुरवठा खंडित झाला होता दरम्यान महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने कोसळलेले झाड बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली
अचानक घडलेल्या या घटनेने या भागातील सगळेच थोडा वेळ गोंधळले होते सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही.