भुसावळ – येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्रता सेनानी मनोगत’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी खा. संस्थाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील प्रिन्सीपल अनघा पाटील यासह शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थीत होते.
या स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चिमुकल्याने विविध स्वातंत्र्य वीरांची वेशभूषा साकारली होती. झाशीची राणी ,भगतसिंग ,सुभाष चंद्र बोस डॉ .बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू व सावित्रीबाई फुले अशा विविध वेशभूषा साकारल्या. आपले भारतीय स्वतंत्र लढ्यातील योगदान सांगून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्याचे महत्त्व देखील सांगितले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील उपस्थित होत्या व त्यांनी सर्व चिमुकल्या स्वातंत्र्यसेनानींचे त्यांनी कौतुक केले.