रावेर तालुक्यातील वाघोड येथील घटना
रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाघोड येथे ६५ वर्षीय इसमाने स्वतःच्या गळ्यावर विळ्याने वार करून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाघोड ता. रावेर येथील रहिवासी शासकीय चिंतामण फकीरा कुंभार (वय-६५) यांनी दि. २१ शुक्रवारीच्या पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान स्वतः च्या गळ्यावर स्वतः च्या हाताने विळ्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय जळगाव येथे नेले होते. मात्र अति रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषीत केले. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवलदार नितीन आमोदकर हे पुढील तपास करीत आहेत.