चाळीसगाव (प्रतिनिधी ) – शहरातील मालेगाव रोड परिसरात चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून तसेच पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या “सबके के लिए आवास अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत” चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे हक्काचे मिळावे यासाठी “शिवनेरी पार्क” हा भव्य गृहप्रकल्प उभा राहत आहे. चाळीसगाव शहरातील ही पहिलीच अशी भव्य टाऊनशिप असून जवळपास ८०० हुन अधिक घरे निर्माण केली जाणार आहेत. या भव्य अश्या गृह प्रकल्पाचे उद्घाटन धुळे येथील BAPS स्वामीनारायण मंदिराचे महंत प.पू. कोठारी स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या व आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते घराची सर्वप्रथम नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्याला घराची चावी देण्यात आली.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, भाजयुमोच्या प्रदेश सचिव सौ.भैरवीताई वाघ पलांडे, जेष्ठ विधिज्ञ धनंजय ठोके, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व संचालक संजय कुमावत, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, RPI जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष आनंद खरात, भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, माजी नगरसेविका सौ.संगीताताई राजेंद्र गवळी, चिराग शेख, अमोल चव्हाण, तळोदे प्रदे गावाचे सरपंच संजय पाटील, शिवनेरी पार्कचे संचालक राजेंद्र पाटील, तांत्रिक सल्लागार दिनेश क्षीरसागर, गोल्डन इव्हेंट्स नाशिक च्या श्वेता चव्हाण व त्यांची टीम यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.
प.पू.स्वामी कोठारी आनंदजीवन स्वामी यांनी आपल्या आशिर्वादपर मनोगतात आमदार मंगेश चव्हाण यांच्या “शिवनेरी पार्क” या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच पार्कच्या बाजूलाच लवकरच भव्य अश्या स्वामीनारायण मंदिरासाठी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी एक एकर जागा कुठलाही एक रुपयाचा मोबदला न घेता दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. येत्या ऑक्टोबर मध्ये दिवाळी च्या शुभमंगल पर्वावर भव्य अश्या BAPS स्वामीनारायण मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे देखील आनंदजीवन स्वामी यांनी जाहीर केले.
चाळीसगाव शहरातील मालेगाव रोड परिसरात निर्माण होत असलेले भव्य स्वामीनारायण मंदिर व शिवनेरी पार्क गृहप्रकल्प यामुळे परिसराची शोभा वाढणार असून हे चाळीसगाव चाळीसगाव शहराची नवीन ओळख निर्माण होणार आहे. याठिकाणी मुंबई, पुणे,नाशिक या मोठ्या शहरांप्रमाणे गृह प्रकल्पाची माहिती देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असणारा पेंडॉल उभारण्यात आला असून गोल्डन इव्हेंट्स मार्फत स्मार्ट सिटी प्रमाणे कॉर्पोरेट वातावरण निर्माण करण्यात आले आहे. अश्या प्रकार चाळीसगाव शहरात प्रथमच आयोजन होत असल्याने येणाऱ्या प्रत्येक चाळीसगाव वासीयांना आपण महानगरातील गृहप्रकल्पात आलो आहोत की अशी अनुभूती मिळत होती.
दिनांक 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत शिवनेरी पार्क येथे घरांची नोंदणी सुरू राहणार असून आज पहिल्याच दिवशी हजारो चाळीसगाव वासियांनी या प्रकल्पाला भेट दिली व माहिती जाणून घेतली. पाहिल्याच दिवशी मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे जवळपास दीडशेहून अधिक घरांची नोंदणी या ठिकाणी झाली.
सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे हाच शिवनेरी पार्कचा हेतू – आमदार मंगेश चव्हाण
डोक्यावर हक्काच्या घराचं कवच असावं.ते पण वेगाने विकिसित चाळीसगाव शहरात… असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सगळ्यांचं स्वप्न मात्र पूर्ण होत नाही. परिस्थिती नावाचे डोंगर, आर्थिक संकटे वाटेत उभी असतात. स्वतःचं घर नसल्याची वेदना मी अनुभवलीयं. म्हणूनच चाळीसगाव तालुक्यात कुणीही त्या स्वप्नापासून वंचित राहू नये, हाच ध्यास घेऊन या स्वप्नाचा पाठलाग केला.
आमदारकीची विजयी माळ गळ्यात पडण्याआधी सर्वसामान्यांना परवडेल अश्या ‘गृह प्रकल्पाचा’ शब्द माझ्या वाढदिवसानिमित्त २३ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात दिला होता. आज त्याच स्वप्नपूर्तीचे प्रत्यक्षात शुभारंभ करतांना ऊर अभिमानान अतिशय माफक अशा किमतींमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिले आहेत तरी जास्तीत जास्त चाळीसगाव वासियांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.