जळगाव (प्रतिनिधी) – येथील स्वाध्याय भवन येथे दि. ०९ ऑक्टोबर रोजी होमिओपॅथी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात ११५ जणांवर उपचार करण्यात आले. विविध आजार असलेल्या रुग्णांनी प्रकृती तपासून घेतली व आजारावर उपचार करून घेतला.
मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. निधि जैन हे गेल्या अनेक वर्षांपासून परमपुज्य गुलाब मुनीजी महाराज यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने स्वयंस्फूर्तीने त्यांचा भारतात जिथेही चातुर्मास महोत्सव असतो तिथे जाऊन रुग्णांसाठी मोफत होमिओपॅथी शिबीर आयोजित करतात. गुरुंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. शिबीराचे उद्घाटन विजयराज कोटेचा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. निधि जैन, अजय राखेचा, अनिल कोठारी, आशिष भंडारी, तेजस कावडीया उपस्थित होते. भुसावळ येथील डॉ. पूजा गादिया, रुपाली प्रजापत यांचे शिबीरासाठी सहकार्य लाभले.