• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून स्वच्छ जळगाव घडवण्यासाठी प्रयत्नशील :  महापौर दीपमाला काळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार

जळगाव महापालिकेच्या २३ व्या स्थापना दिनानिमित्त माजी महापौरांचे भावपूर्ण सन्मान

‘माझा जळगाव, स्वच्छ जळगाव’ चर्चासत्रात स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहर महानगरपालिकेच्या २३ व्या स्थापना दिनानिमित्त महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिकेच्या माजी महापौरांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला. तसेच, ‘माझ जळगाव, स्वच्छ जळगाव’ या विषयावर भव्य परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादामध्ये विविध  स्वयंसेवी संघटनांनी सहभागी होऊन सूचना मांडल्या.

या कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, उपायुक्त धनश्री शिंदे, सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि नगरसचिव सतीश शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्थापना दिनाचे औचित्य साधून  महानगरपालिकेच्या प्रथम महापौर आशाताई कोल्हे यांच्यासह माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा आणि भारती सोनवणे यांचा महापौर व उपमहापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, महापालिका प्रशासनाच्या वतीने विद्यमान महापौर दीपमाला काळे यांचाही गौरव करण्यात आला.

महापौरांचे ‘स्वच्छता व्हिजन’
परिसंवादादरम्यान बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी जळगावला स्वच्छ बनवण्यासाठी आपले व्हिजन मांडले. त्या म्हणाल्या, इंदौरच्या धर्तीवर आपले शहर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न केले जाणार आहेत. स्वच्छ शहराच्या रँकिंगमध्ये आपले जळगाव येण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. शहर सुंदर करण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचा आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

सामाजिक संस्थांच्या आग्रही सूचना
परिसंवादात शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी जळगावच्या स्वच्छतेबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. यामध्ये रोटरी संस्थेच्या विविध शाखा, लायन्स क्लब  सुधर्मा संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, जैन महिला मंडळ, सीए असोसिएशन,ज्येष्ठ नागरिक संघ, सुरभी महिला मंडळ, जळगाव सायकलिस्ट ग्रुप, जळगाव रनर्स ग्रुप, माझे शहर माझे जळगाव ग्रुप, एडवोकेट बार असोसिएशन,  क्रेडाई, धर्माधिकारी प्रतिष्ठान आदी संस्थांनी सहभाग घेतला. प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शहरात प्लास्टिक मुक्ती आवश्यक आहे. कापडी पिशव्यांच्या वापरासाठी व्यापक मोहीम राबवावी. महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सना शहरात पर्यायी जागा देऊन वाहतूक सुरळीत करावी. कचरा वेचणाऱ्या महिलांना आवश्यक साधने देऊन त्यांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख द्यावी. शहरात प्रभागांसाठी ‘बेस्ट वॉर्ड’ स्पर्धा सुरू करून सन्मानित करावे.

गोलाणी मार्केटमधील अस्वच्छता, उघड्या गटारीमुळे होणारा कचरा देखील अस्वच्छता पसरवतो आणि घंटागाडीतून रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी नागरिकांनी केल्या. महापौर दीपमाला काळे यांनी या सर्व सूचनांची दखल घेत भविष्यात लोकसहभागातून स्वच्छ जळगाव साकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव सतीश शुक्ला यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. शुचिता हाडा यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: dipmala kale madam news
Previous Post

सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार

Next Post

रावेरमध्ये भरवस्तीत घरफोडी; तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेरमध्ये भरवस्तीत घरफोडी; तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!
1xbet russia

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार
जैन कंपनी

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

March 21, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमध्ये भरवस्तीत घरफोडी; तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

March 21, 2026
सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार
1xbet russia

स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून स्वच्छ जळगाव घडवण्यासाठी प्रयत्नशील :  महापौर दीपमाला काळे

March 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

March 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon