पाचोरा शहरात शिवतीर्थ येथे आयोजन
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांच्या मातोश्री स्व. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. ७ मार्च रोजी भडगाव रोडवरील चिंतामणी कॉलनी, शिवतीर्थ येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच, रात्री ८ वाजता कीर्तनकार हभप समाधान महाराज भोजेकर, शनिवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता कीर्तनकार हभप गोविंदा महाराज वरसाडेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तर कार्याचा कार्यक्रम शनिवार ८ रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.