पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित सा.प. शिंदे प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षिका सुवर्णा पाटील लिखित “सुंदर हस्ताक्षर” या पुस्तकाचे प्रकाशन आज दि. २८ रोजी प्राचार्य बी. एन. बापू पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
सहकार नेते सतीश शिंदे, पी.टी.सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, पिटीसीचे संचालक डॉ.जयवंतराव पाटील, गिरणाई संस्थेचे सचिव ॲड. जे. डी. काटकर, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष नीरज मनोज, शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील, जितेंद्र पाटील उपस्थित होते. सा. प. शिंदे प्राथमिक विद्यालय पाचोरा येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्राचार्य बी.एन.बापू पाटील व मान्यवरांच्या हस्ते “सुंदर हस्ताक्षर” या कृती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. बी. एन.पाटील यांनी पुस्तकाचे मुक्तकंठाने कौतुक करत लेखिका सुवर्णा पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुंदर हस्ताक्षर पुस्तकाच्या लेखिका श्रीमती सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी पुस्तक परिचय करून दिला. शिंदे शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर मुंबई येथील डॉ.प्रतीक्षा प्रसाद बोर्डे यांनी सूत्रसंचालन केले.तसेच डॉ. अर्चना विसावे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पाचोरा शहर व तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक- शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एल जी ग्रुप,तसेच सा.प.शिंदे शाळेतील व पी. के. शिंदे विद्यालयातील शिक्षक बंधू- भगिनी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.