जळगावच्या अभियंत्यांचे निर्देश
जळगांव (प्रतिनिधी) :- दीपावली सुट्टीच्या काळात महावितरणची सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश मुख्य अभियंतांनी दिले आहेत. दि. ११ व १२ नोव्हेंबर रोजी शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या आहेत. त्यास जोडूनच दीपावलीच्या काळात १३ ते १४ नोव्हेंबर दरम्यानही सुट्ट्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगांव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणची सर्व वीज बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी दिले आहेत.
या शिवाय, महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जाऊन view and pay bill वरही ग्राहकांना वीजबिल भरता येईल. महावितरण मोबाईल ॲपसह इतर सर्वच ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या ग्राहकांना त्यांची वीजदेयके ऑनलाईन भरता येतील, असेही त्यांनी कळविले आहे.