जळगाव तालुक्यातील खेडी शिवारातील घटना
तुषार वसंत चौधरी (रा. दादावाडी, जळगाव) यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलाकर सांडू पाटील (वय ५३), त्यांची पत्नी निर्मला कमलाकर पाटील (वय ५०) आणि मुलगा संकेत कमलाकर पाटील (वय ३०,सर्व रा. काशीनाथ नगर, खेडी), यांनी त्यांच्यासोबत १० ते १२ इतर अज्ञात व्यक्तींच्या मदतीने तहसीलदारांनी सीलबंद केलेल्या मालमत्तेच्या दरवाजावरील सील आणि कुलूप तोडले. एवढेच नाही तर, कार्यालयातर्फे लावलेली ताबा नोटीस देखील फाडून टाकली आणि जबरदस्तीने त्या मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा केला.
मालमत्तेच्या ठिकाणी असलेले सुरक्षा रक्षक कुणाल शशिकांत तायडे (वय ४०, रा.कालिंकामाता मंदिराजवळ, जळगाव) यांना संशयित आरोपींनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यातील श्रीराम विठ्ठल बोरसे हे तपास करत आहेत.