नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) -भारताचा आघाडीचा क्रिकेटवीर सुरेश रैना याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. देशाचे आणि उत्तरप्रदेशकडून खेळण्याचे भाग्य मला लाभले याचा मला अभिमान असल्याचे सुरेश रैना याने सांगितले. मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत आहे. मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज, राजीव शुक्ला आणि माझ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो.