मुंबई (वृत्तसंस्था ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार आणि कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाला असून याबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी स्वत:एक्स या सोशल मीडिया हँडलवर करत ही माहिती दिली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
https://x.com/supriya_sule/status/1822535939656401008
माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. असे खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.