पहूर , ता .जामनेर ( वार्ताहर ) – पहूर येथे ग्रामीण रुग्णालयात सुप्रीम कंपनी मित्र परिवाराच्या माध्यमातून डिजिटल मॅनिटर प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.
पहूर परिसरात कोवीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने आणि आरोग्यदूत अरविंद देशमुख यांच्या पुढाकाराने सुप्रीम कंपनी मित्र परिवाराच्या माध्यमातून डिजिटल माँनिटर प्रणालीचे आज रविवारी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले .
डिजिटल मॉनिटर प्रणालीमध्ये एकाच वेळी रुग्णाचा ताप , रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन लेव्हल तपासली जाणार आहे. यामुळे रुग्णांवर कमी वेळात योग्य उपचार करणे शक्य होणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .जितेंद्र वानखेडे यांनी सांगितले .
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे ,आरोग्यदूत अरविंद देशमुख , पहूर पेठच्या सरपंच नीता रामेश्वर पाटील , वैद्यकीय अधिकारी डॉ . जितेंद्र वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले .कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख ,महाराष्ट्र बेलदार सभेचे जळगाव जिल्हा युवा कार्याध्यक्ष प्रवीण कुमावत , तालुकाध्यक्ष सचिन कुमावत , राजू जाधव , स्वप्निल कुमावत ,शंकर भामेरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते . सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले.