जळगाव ( प्रतिनिधी ) – संत दर्शनसिंह महाराज (1921 -1989) जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणीना उजाळा देणारा ऑनलाइन कार्यक्रम आयोजित आला .होता दर्शनसिंह महाराज यांचा जन्म 14 सप्टेंबर 1921 रोजी झाला होता
या कार्यक्रमात संत दर्शनसिंह महाराज यांचे जीवन, त्यांची शिकवणूक आणि वारसा रूपात आपणास ते जे काही देऊन गेले त्याची आठवण केली गेली. सावन कृपाल रूहानी मिशनचे अध्यक्ष संत राजिंदरसिंह महाराज म्हणतात की, संत दर्शनसिंह महाराज प्रेमाचे महासागर होते. त्यांनी शिकवणुकीतून लाखो लोकांचे जीवन बदलून प्रभुप्रती केले.
या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात माता रीटाजी यांच्या गुरुवाणीतील गायनाने झाली. त्यांनी शीखांचे तिसरे गुरु, गुरू अमरदास महाराजांची वाणी, “सद्गुरु की सेवा सफल है, जे को करे चित लाई।” या गायनाने केली. नंतर संत राजिदंरसिंह महाराज यांनी अमेरिकेहून युट्युबवर लाईव्ह दिव्य प्रेम आणि अध्यात्मिक संदेश दिला.
संत राजिंदरसिंह महाराज यांनी आपल्या संदेशात म्हटले की, 14 सप्टेंबर 1921 रोजी प्रभूचा हा दिव्य प्रकाश पूर्वेस प्रकट झाला संपूर्ण विश्वात पसरला. त्यांनी प्रत्येकाच्या हृदयाला, जो त्यांच्या संपर्कात आला त्यास प्रसन्नतेने आणि आनंदाने भरले. संत दर्शनसिंह महाराज बाह्य मतभेद मानत नसत. ते म्हणत असत, आपण सर्व एकाच पिता परमेश्वराची संतान आहोत. ते त्यांच्या काळातील महान सुफी संत होते. त्यांचे जीवन निष्काम सेवा आणि अध्यात्मिकते प्रती समर्पित होते. संत दर्शन सिंह महाराजांची इच्छा होती की सर्वांनी जीवनाचा मुख्य उद्देश , स्वतःला ओळखणे आणि प्रभूला प्राप्त करणे तो याच जन्मी पूर्ण करावा. आपले खरे अस्तित्व जे आत्मिक आहे, त्याप्रती जागृत राहावे त्याची अनुभूती घेण्याकरिता दिव्य प्रेमाच्या मार्गाला अनुसरावे. आपणास खऱ्या या अर्थाने संत दर्शनसिंह महाराजांची जन्मशताब्दी साजरी करावयाची असेल तर त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाला अनुसरले पाहिजे. आपल्या 4 विश्वयात्राद्वारे त्यांनी लाखो लोकांच्या जीवनाला प्रभूकडे वळविले असेही ते म्हणाले.
याप्रसंगी शांतिअवेदना सदन, राज नगर, नवी दिल्लीमध्ये कॅन्सर पीडित रुग्णांसाठी, जंगपुरा स्थित मिशनरीज ऑफ चैरीटी, जीवन ज्योती होम कालेखां मध्ये स्थित मानव मंदिर मिशन ट्रस्टच्या मुलांना औषधे, फळे, भाज्या व अन्य उपयोगी वस्तूंचे मोफत वितरण केले गेले.
संत दर्शनसिंह महाराज यांनी सन 1974 मध्ये हुजुर बाबा सावनसिंह महाराज आणि संत कृपालसिंह महाराज यांच्या नावे “सावन कृपाल रुहानी मिशन” ची स्थापना केली. त्यांनी अध्यात्म शिकवणुकीला नवीन शैलीत प्रस्तुत केले, ज्यामुळे हजारो लोक त्यांच्याकडून दीक्षा घेण्यास प्रेरित झाले
संत दर्शनसिंह महाराज यांना सुफी शायर म्हणून ओळखले जाते. त्यांना दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या उर्दू अकॅडमीकडून पुरस्कृत केले गेले. दर्शन सिंह महाराज 30 मे 1989 रोजी महासमाधीत लीन झाले. त्यानंतर दर्शनसिंह महाराजांची शिकवणुक आणि त्यांचा कार्यभार त्यांचे सुपुत्र संत राजिदंरसिंह महाराज चालवत आहेत.
संत राजिदंरसिंह महाराज सध्या विश्वात ध्यान अभ्यासाद्वारे प्रेम, एकता शांतिचा संदेश प्रसारित करीत आहेत.त्यांना विभिन्न देशांकडून शांति पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.पाच डॉक्टरेटच्या उपाधीने सन्मानित केले गेले आहे. सावन कृपाल रुहानी मिशनची विश्वभरात 3200 पेक्षा अधिक केंद्रे स्थापित आहेत.मिशनचे साहित्य विश्वातील 55 भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. मुख्यालय दिल्लीत व आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिका येथे आहे.